अल्पवयीन मुलीला देहविक्रयासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. या दोन आरोपींनी मुलीला विकण्यासाठी वेश्यागृहाचा मालक समजून एका पोलीस अधिकाऱ्यालाच चुकून फोन केला आणि पोलिसांनीही मोठ्या शिताफीनं त्यांना कोणताही संशय येणार अशा पद्धतीनं अलगद आपल्या जाळ्यात ओढलं. अमर आणि रणजित शाह या दोघांना त्यांच्या एका मित्रानं एक मोबाईल क्रमांक दिला होता.त्यामुळे चुकून पोलीस अधिकाऱ्याला फोन करून आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला विकण्यासाठी बोलणी सुरू केली.पोलीस अधिकाऱ्याच्या हे लक्षात येताच त्यांनी सतर्कता दाखवत आरोपींना आपण वेश्यागृह मालक बोलत असल्याचंच भासवलं. आरोपींशी त्यांनी मुलगी विकत घेण्याची डीलही पक्की केली.आणि आरोपींना नवी दिल्ली रेल्वेस्टेशनबाहेर भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर, वेश्यागृह मालकाची माणसं म्हणून दोन पोलीसच आरोपींना रेल्वे स्टेशनवर भेटले.आरोपींनी पोलिसांकडे मुलीला विकण्यासाठी 3.5 लाखांची मागणी केली.पोलिसांनी 2.3 लाखांवर ही डील पक्की केली. 20 हजार रुपये अॅडव्हान्स घेतल्यानंतर आरोपी मुलीला घेऊन आले.मुलगी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी शिताफीनं आरोपींना अटक केली.दोन्ही आरोपी बिहारमधील सापोल जिल्ह्याचे रहिवासी आहेत. अमरनं अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. आणि काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं दिल्लीला बोलावून घेतलं. ऑक्टोबर महिन्यात या मुलीनं आपलं घर सोडलं आणि ती दिल्ली ला आली. अमरनं तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले.त्यानंतर त्यानं मित्राच्या मदतीनं या मुलीला देहविक्रयासाठी विकण्याचा कट रचला. मिळालेल्या पैशांतून त्याला बाईक विकत घ्यायची होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews